आपल्या महाराष्ट्र सरकार विविध योजना सुरु करून शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत असते. आता कृषी विभागाला प्रोत्साहन देणेसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना’ (Krushi Yantrikikaran Yojana 2022) सुरु केली आहे. ह्या योजने द्वारे राज्यातील शेतकरी बांधवाना विविध प्रकारे आपल्या शेती उद्योगासाठी लाभ घेता येणार आहे आणि आपल्या उत्पन्नात वाढ करता येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा (Krushi Yantrikikaran Yojana) लाभ घेता यणयासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची सुविधा सुरु केलेली आहे. ह्या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणांवर अगदी ८० टक्के पर्यंत लाभ घेता येणार आहे. आता ह्या योजनेबद्धल आम्ही आपणांस अगदी सविस्तर पद्धतिने खाली नमूद करणार आहोत ते आपण काळजीपूर्वक वाचावे आणि राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा.
आदरणीय शेतकरी मित्रांनो, आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पादनासाठी यांत्रिकीकरण करणे आवश्यक आहे. कृषी यांत्रिकीकरण म्हणजे शेतीत प्रगती आणि ऊर्जाशक्तीचा उपयोग. कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत (Krishi Yantrikikaran Yojana) यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात जेणेकरून शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकेल. कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१/२०२२ अंतर्गत ट्रॅक्टर, उडणारी फॅन, औषध फवारणी पंप, श्रेडर, डस्टर, सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेद्वारे पुरविल्या जातात. अशाप्रकारे, विविध योजनांद्वारे गेल्या ५ वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनेक अशा शेतकरी बांधवाना लाभ देण्यात आला आहे.
“मिशन ऑन एग्रीकल्चर मॅकेनाइझेशन” (एनजीटी) योजनेद्वारे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातील विविध शेतकर्यांना कृषी यांत्रिकीकरण योजना २०२१ / २०२२ द्वारे अगदी ८०% पर्यंत अनुदान देणार आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील शेतकरी शेतीसाठी प्रेरित होतील व शेतीतून अधिक प्रमाणात उत्पन्न काढेल.
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान
उपकरण | मिळणारे अनुदान |
---|---|
पंपसेट (७.५ H.P पर्यंत) | निर्धारित किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त १०००० रुपये |
ट्रॅक्टर (40 H.P पर्यंत) | निर्धारित किमतीच्या 20% किंवा जास्तीत जास्त ४५००० रुपये |
उस तोडणी यंत्र | निर्धारित किमतीच्या ४०% किंवा जास्तीत जास्त २०००० रुपये |
पॉवर टीलर (८ H.P किंवा त्यापेक्षा जास्त) | निर्धारित किमतीच्या ४०% किंवा जास्तीत जास्त ४५००० रुपये |
पॉवर थ्रेशर | निर्धारित किमतीच्या ४०% किंवा जास्तीत जास्त २०००० रुपये |
ट्रॅक्टर फवारणी यंत्र | निर्धारित किमतीच्या २५% किंवा जास्तीत जास्त ४००० रुपये |
रोटावेटर | निर्धारित किमतीच्या ५०% किंवा जास्तीत जास्त ३०००० रुपये |
विनोइंग फैन, चेफ कटर (मानवचालित) | निर्धारित किमतीच्या २५% किंवा जास्तीत जास्त २००० रुपये |
अधिक माहिती करीता आम्ही खाली Krushi Yantrikikaran Yojana 2021 Pdf फाईल आपणास उपलब्ध करून देत आहोत ते डाऊनलोड करून तुम्ही अधिक माहिती पाहू शकता.
कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- शेतकर्याचे आधारकार्ड
- बँकेचे पासबूक
- 7/12 व 8 अ.
- जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे original बिल.
- जर ट्रॅक्टर शेतकर्याचे नावावर असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.
Krushi Yantrikikaran Yojana 2022 पात्रता
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
- अर्जदार शेतकर्याच्या नावावर शेत जमीन असावी.
- अर्जदार शेतकरी जर अनुसूचीत जाती किंवा जमाती या विभागात मोडत असेल तर त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर अर्जदार शेतकर्याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.
कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 ऑनलाइन अर्ज
तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2021 / 2022 चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी लागेल.
वेबसाइट ला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.
- मुखपृष्ठावरच तुम्हाला Online Application किंवा Link 2 असे पर्याय दिसतील तुम्हाला त्यापैकि कुठल्याही एका पर्यायवर क्लिक करा.
- नंतर पुढील पृष्ठावर तुमच्या समोर Krushi Yantrikikaran Yojana 2021 चा अर्ज ओपन होईल.
- अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने अचूक भरावी लागेल. (चुकीची माहिती आढल्यास तुम्ही पात्र ठरू शकणार नाही)
- सर्व माहिती भरल्यानंतर Submit Button वर क्लिक करा.
- अश्या प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज भरतांना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही खाली कमेन्ट करून आम्हाला संपर्क करू शकतात.
अशाच शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.
आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा
शेती विषयक, सरकारी, निम सरकारी योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला सदैव भेट द्या व आजच आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा.