Atal Pension Yojana / अटल पेन्शन योजना चा २०२२ वर्षभरात एक नवीन विक्रम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटल पेन्शन योजनेत २०२२ ह्या वर्षभरात १ कोटी हुन अधिक भारतीय नागरिकांनी आपले रेजिस्ट्रेशन केले आहे.
भारत सरकारने सुरु केलेल्या Atal Pension Yojana / [APY] योजनेमध्ये गेल्या वर्ष भरात म्हणजे २०२२ मध्ये सर्वाधिक ती म्हणजे कुठल्याही वर्षापेक्षा ३६ टक्के पेक्षा जास्ती नोंदणी झाली आहे. ह्या अटल पेन्शन योजनेमध्ये सुरु झाल्यापासून पहिल्यांदा रेजिस्ट्रेशन १ कोटी पेक्षा जास्ती पार झाले आहे. ह्या पेन्शन योजनेमध्ये २०२१ वर्षात साधारणतः ९२ लाख रेजिस्ट्रेशन झाले होते, २०१९ म्हणजे कोविड च्या आधी साधारणतः ६९ लाख रेजिस्ट्रेशन झाले होते आणि आता ह्या योजनेने रेजिस्ट्रेशन मध्ये सर्वाधिक उच्चअंक गाठला आहे .
APY Contribution Link – Click Here / इथे क्लिक करा
हे हि वाचा –> Acharya Balshastri Jambhekar Sanman Yojana in Marathi | वरिष्ठ पत्रकार पेन्शन योजना महाराष्ट्र [Maharashtra Government Yojana]
Atal Pension Yojana – Key Points / अटल पेन्शन योजना – काही महत्वाचे मुद्दे
- PFRDA – पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ने अशी माहिती दिली आहे की, अटल पेन्शन योजनेच्या ग्राहकांच्या सुलभ ऑनबोर्डिंगसाठी म्हणजेच नोंदणीसाठी ऑटोमेशन केल्यामुळे हि सर्वोच्च आकड्याची नोंदणी शक्य झाली आहे.
- PFRDA नेहमीपणे सार्वजनिक क्षेत्रातील बँका (PSUs), वित्तीय सेवा विभाग आणि राज्य-स्तरीय बँकर्स समित्यांशी सल्लामसलत करते आणि देशभरात APY (अटल पेन्शन योजना) च्या अंमलबजावणीचे पुनरावलोकन आणि सुधारण्यासाठी थेट व्यवस्थापकांना नेतृत्व करते.
- आतापर्यंत झालेल्या बऱ्याच नोंदणी केलेल्या सदस्यांनी अटल पेन्शन योजनेत पेन्शन साठी रु.१००० पेन्शनचा पर्याय निवडला आहे आणि त्यानंतर साधारणतः ११ टक्के लोकांनी दरमहा रु.५००० या प्रकारच्या पेन्शनची निवड केली आहे.
- नोंदणी करण्याऱ्यांमध्ये सर्वाधिक वयानुसार २०-२५ वर्षे असलेल्यांची जास्ती नावनोंदणी करण्यात आली ज्यात १३.७ दशलक्ष रेजिस्ट्रेशन आहेत, त्यानंतर २५-३० वयोगटातील १२.१ दशलक्ष नोंदणी सदस्य आहेत.
हे हि वाचा –> [Application Form] Shravan Bal Seva Rajya Nivruttivetan Yojana 2022 Maharashtra [Apply Now]
अटल पेन्शन योजने विषयी – About APY
atal pension yojana form pdf – Marathi
अटल पेन्शन योजना [Atal Pension Yojana] ह्या पूर्वी स्वावलंबन योजना म्हणून सुरु केली होती किंवा ओळखली जात होती. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी ९ मे २०१५ रोजी कोलकाता येथे सुरू केलेली ही भारतातील नागरिकांसाठी सरकार-समर्थित पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत, भारत सरकारने २०१०-११ आणि पुढच्या तीन वर्षात उघडलेल्या गेलेल्या अथवा सुरु केलेल्या प्रत्येक NPS खात्यात दर वर्ष रु.१००० चे काँट्रीब्युशन दिले होते म्हणजेच सरकारी अनुदान दिले होते.
हे ही वाचा – > Ladli Bahan Yojana – मध्य प्रदेश मुख्यमंत्री ने महिलाओं के लिए हर महीना रु.१००० घोषित किये
atal pension yojana form pdf – English
ही योजना तदनंतर अटल पेन्शन योजनेने बदलली आहे. ह्या योजनेमध्ये ४० वर्षांखालील सर्व सदस्यत्व किंवा नोंदणी करणारे कामगार ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा रु.५००० पर्यंतच्या पेन्शनसाठी पात्र आहेत. या योजनेला भारत सरकरने आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव दिले, म्हणून हि योजना अटल पेन्शन योजना म्हणून आता ओळखली जाते.